नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज जाहीर केले की, आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुक भाजप एआयएडीएमकेबरोबर लढेल. जेपी नड्डा दोन दिवसांच्या तामिळनाडू दौर्यावर आहेत, त्यांनी दोन्ही पक्षांमधील युती सुरू ठेवल्याची पुष्टी केली. मदुरै येथे पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगाल, केरळ, आसामसह तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत.
जेपी नड्डा यांनी युतीची घोषणा करताना एका रॅलीत म्हंटले की, “मला तुमच्या बरोबर सामायिक करायचे आहे कि, भारतीय जनता पक्षाने एआयएडीएमके आणि समविचारी पक्षांसह येत्या काळात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे” भाजप अध्यक्षांनी शनिवारी सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये डिफेन्स कॉरिडॉरसारखा प्रकल्प सुरू केला, तर कॉंग्रेसप्रणीत युपीए सरकारने राज्याला पूर्णपणे सोडले होते. गेल्या आठवड्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत दिल्लीत बैठक घेतली. दरम्यान, त्यावेळी ते म्हणाले होते की, त्यांच्यासमोर राज्याचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नाही.