नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने ग्रुप बी मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक सहाय्यक/ टेक्निकल असिस्टंटचे एकूण ४९५ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी recruitment.nic.in या वेबसाइटवर २६ मार्च २०२० ला संध्याकाळी ५ वाजता करू शकता. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राद्वारे २३ फेब्रुवारी २०२० ला त्यांच्या वेबसाइटवरून केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज २६ फेब्रुवारी २०२० ला सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. एनआयसीतर्फे परीक्षेच्या तारखांची घोषणा केली जाईल.
या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
सायंटिस्ट बी (ग्रुप बी) – 288 पदे
वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक ए (गट ब) – 207 पदे
हे असतील पात्रतेचे निकष
सायंटिस्ट बी (ग्रुप बी) – संबंधित ट्रेंड मध्ये बीई/ बीटेक डिग्री किंवा डोएक बी लेव्हल किंवा एएमआय/ जीआयएटीई किंवा एमएससी किंवा एमई/ एमटेक किंवा एमफिल डिग्री
वैज्ञानिक/ तांत्रिक सहाय्यक ए (ग्रुप बी) – संबंधित व्यापारात बीई/ बीटेक पदवी किंवा एमएससी किंवा एमसीए किंवा एमएस पास.
सायंटिस्ट-ए किंवा सायंटिस्ट/ टेक्निकल असिस्टंट-ए या पदासाठी अर्ज करायला इच्छुक असणाऱ्यांचे २६ मार्च २०२० रोजी ३० वय असावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रात सायंटिस्ट-बी किंवा सायंटिफिक/ असिस्टंट-ए च्या पदांसाठी अर्ज शुल्क ८०० रुपये असून एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी भरायची गरज नाही.
असा करा अर्ज
या पदांच्या भरतीसाठी recruitment.nic.in या साइटवर २६ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करायच्या अगोदर ऑफिशियल नोटिफिकेशन, ऑनलाइन अर्जासंबंधी अॅप्लिकेशन स्टेप्स जरूर बघून घ्या.