अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील मेरिलॅंड राज्यातील लष्करी तळावरुन ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभाई पटेल विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्रम्प दाम्पत्याचे स्वागत केले आहे.
Gujarat: US President Donald Trump writes a message in the visitors' book at the Sabarmati Ashram, 'To my great friend Prime Minister Modi…Thank You, Wonderful Visit!' pic.twitter.com/mxpJbSMg4W
— ANI (@ANI) February 24, 2020
ट्रम्प 14 तासाचा प्रवास करुन ते भारतभूमीवर उतरले. त्यांनी विमानतळावरुन थेट महात्मा गांधी आश्रमाला प्रथम भेट दिली. यानंतर साबरमती आश्रमाचा संपूर्ण परिसर डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प यांनी मोदींसोबत पाहिला. यावेळी महात्मा गांधींच्या चरख्यावर सुतकताईचं कामही ट्रम्प दाम्पत्यांनी केले. त्याचबरोबर मोदींनी गांधीच्या आश्रमातील विविध वस्तू आणि आश्रमाची माहिती दिली. तसेच महात्मा गांधींचे आत्मचरित्र पुस्तकही भेट दिले.
साबरमती आश्रमाला अभिप्राय नोंद वहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संदेश लिहला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या संदेशाला अनुमती दर्शवत मेलानिया ट्रम्प यांनीही आपली स्वाक्षरी केली. ‘टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी… थँक्यू फॉर दिस वंडरफुल्ल व्हिसीट’ असा संदेश ट्रम्प यांनी लिहला आहे. मात्र, या अभिप्राय पुस्तकावर ट्रम्प यांनी महात्मा गांधी किंवा साबरमती आश्रमाबद्दल काहीच लिहिले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण साबरमती आश्रमातील शुभेच्छा संदेशात गांधीचा विसर पडल्याचे त्यांच्या अभिप्रायावरुन दिसत आहे. तर, मोदींचा खास उल्लेख करत ‘माय ग्रेट फ्रेंड’ असे ट्रम्प यांनी लिहले आहे.