नवी दिल्ली वृत्तसंस्था – मनात जिद्द असली की कितीही अडचणी असल्यास त्यावर मात करून यश मिळते. असंच काहीसं नवी दिल्लीत घडलं. ५ वर्षांपासून जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या रामजल मीणा या तरुणाने जेएनएयूमध्येच बीए रशियन अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
रामजल मीणा हा राजस्थानातील करौली जिल्ह्यातील राहणारा आहे. रामजलला तीन मुलं आहेत. त्याने २००२ मध्ये १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्याने नवी दिल्लीत जेएनयूमध्ये गार्डचे काम सुरु केले.
राजमल मीणाचे वडील रोजंदारीवर काम करायचे. तो खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत पुढे आला. त्याने राजस्थान मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र, इतिहास, हिंदी विषय घेऊन पदवी उत्तीर्ण झाला.
त्याचे लग्न झाले असून तीन मुली आहेत. तो मुनीरका येथे एका छोट्याशा खोलीत राहतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पुर्ण करता आले नसल्याची खंत त्याच्या मनात होती. त्याने जेएनयूचे वातावरण अनुभवल्याने शिक्षणाचे स्वप्न पुर्ण झाले आहे. त्याने फोनमधील अप्सवरून पेपर वाचले. त्यातून समान्य ज्ञान विषयाचा अभ्यास केला. तसेच पीडीएफ नोट्ससाठी त्याला मित्र मदत करायचे. परदेशी भाषांमध्ये शिकणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळत असल्याने त्याने परदेशी विषयाची निवड केली. असे त्याने सांगितले.