मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज (शुक्रवार) अटक (Arrest) करण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Vivian Mall) सिनेमागृहात सोमवारी रात्री दहा वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले. यावेळी चित्रपटगृहात एका व्यक्तीला बेदम मारहाण (Beating) झाली होती. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक केल्यानंतर त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो गुन्हा (Crime) कबुल करणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध केला जात असताना अटक करण्यात येत असेल तर हे चुकीचे आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असे रोहित पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आव्हाड यांच्या अटकेच्या कारवाईवर मनसेकडून (MNS) देखील प्रतिक्रिया आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अशी थेरं केली तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली. तर भाजप नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी आव्हाड यांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. त्यांच्यावरील कारवाई अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Web Title : Jitendra Awhad | Jitendra Awad said on the action of arrest – ‘Despite hanging, it is a crime..’
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | शिंदे गटला पहिला धक्का, ठाण्यातील माजी नगरसेविकेची पुन्हा घरवापसी
Rajiv Gandhi Case | राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश