मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मन्सच्या (JEE Main 2021 Exam) चौथ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. याशिवाय चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. आता जेईई मेन्स (JEE Main 2021 Exam) परीक्षा 26 जुलै, 27 जुलै, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर या तारखांना होणार आहेत. jee main 2021 exam national testing agency advised to provide gap 4 weeks between session 3 and session 4 education minister dharmendra pradhan
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीचे ऑनलाइन नोंदणी (Online registration) प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी jeemain.nta.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.
कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता.
यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत.
परंतु एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांना चार संधी
नव्या वेळापत्रकानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी JEE Main 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत.
ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त झाले आहेत त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
परीक्षा केंद्र निवडण्याची संधी
चालू वर्षात विद्यार्थ्यांना अर्ज भरताना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र (Examination Center) निवडण्याची संधी दिली गेली आहे.
या परीक्षेसाठी सध्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या पूर्वीपेक्षा दुप्पट करण्यात आली आहे.
जेणे करुन कोरोनासंबंधी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन होईल.
Web Title : jee main 2021 exam national testing agency advised to provide gap 4 weeks between session 3 and session 4 education minister dharmendra pradhan
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 241 रुग्णांना डिस्चार्ज