नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही केंद्र सरकारचे पेन्शनर्स (Pensioner) असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने पेन्शन (Pension Slip) जारी करणार्या बँकांना सांगितले आहे की, बँक अकाऊंटमध्ये रक्कम आल्यानंतर त्यांनी एसएमएस आणि ईमेलसह व्हॉट्सअॅप (WhatsApp) सारख्या मीडिया अॅपचा सुद्धा वापर करून पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन स्लिप (Pension Slip) पाठवावी. एका अधिकृत आदेशात हे सांगण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आदेशानुसार पेन्शनधारकांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाकडून (Department of Pension and Pensioners’ Welfare) जारी आदेशात म्हटले आहे की, बँका, एसएमएस आणि ईमेलसह व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडिया अॅपचा सुद्धा वापर करू शकतात.
JEE Main 2021 Exam | जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
मागील महिन्यात पेन्शन देणार्या बँकांची केंद्रीय पेन्शन वितरण केंद्रे म्हणजे सीपीपीसी (Central Pension Processing Centres) ची एक बैठक झाली.
ज्यामध्ये पेन्शन धारकांच्या मासिक पेन्शनवर चर्चा झाली.
आदेशानुसार, बँकांना हे कल्याणकारी पाऊल उचलण्यास सांगण्यात आले, जे बँकांनी स्वीकारले आहे.
Web Title : Pension Slip | pensioners may now get pension slip from banks through whatsapp also
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update