Jayant Patil on NCP Political Crisis | शपथविधी पूर्वी दिशाभूल करुन आमदारांच्या सह्या घेतल्या, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा (व्हिडिओ)

Jayant Patil on NCP Political Crisis | maharashtra ncp president jayant patil press conference after ajit pawar join shinde fadnavis government in maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –Jayant Patil on NCP Political Crisis | राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार यांना नेमक्या किती आमदारांचा पठिंबा आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्यावर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (Jayant Patil on NCP Political Crisis)

जयंत पाटील पुढे म्हणाले, पक्षात झालेल्या बंडानंतर (Ajit Pawar Rebellion) आता राष्ट्रवादीने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. याबैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), आमदार अनिल देशमुख (MLA Anil Deshmukh) यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Jayant Patil on NCP Political Crisis)

कार्यकर्त्यांकडून या घटनेचा निषेध

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते. त्यांनी आज बैठकही घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Maharashtra State President) म्हणून मी भूमिका स्पष्ट करत आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून सांगतो की, बहुसंख्य आमदार, पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध करत आहेत. संताप व्यक्त करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

आमदारांची दिशाभूल केली

ज्या काही आमदारांना बोलावून घेतले, त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली याची माहिती आम्हाला अद्याप समजली नाही. काही आमदारांनी दिशाभूल झाली असल्याचे म्हटले. बहुमत असतानाही सत्तारुढ पक्षाने राष्ट्रवादी पक्ष फोडला. 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांनी पलिकडे जाण्याची भूमिका घेतली. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्यासोबत संपर्क साधला असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला.

योग्य वेळी माहिती देईल

आज ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत हे योग्य वेळी सांगेन, असेही जयंत पाटील म्हणाले. 8 जणांची काही वेगळी भूमिका होती ते सतत मांडत होते. ईडी चौकशी (ED Inquiry) दरम्यान, मला निरोप आला का ? तो विषय वेगळा असून मी नंतर भाष्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांना उत्तर देण्यास आलो नाही…

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यासंदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवारांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली नाही. पक्षाने जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून विधिमंडळाला पत्र दिले जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

कायदेशीर सल्ला घेऊ

पक्षात बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांना कायदेशीर अडचणी आल्या, तर त्यांना त्याला तोंड द्यावे लागेल, असा सूचक इशारा जयंत पाटील यांनी दिला.

 

Web Title : Jayant Patil on NCP Political Crisis | maharashtra ncp president jayant patil press conference after
ajit pawar join shinde fadnavis government in maharashtra

हे देखील वाचा