पोलीसनामा ऑनलाइन टीम – श्रीनगर: सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी जम्मू काश्मिरमधील शोपिया सेक्टरमधील हाडीपोरा येथे चकमक उडाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले. भारतीय लष्काराने हाती घेतलेल्या मोहिमेत गेल्या ४८ तासाठी १० दहशतवादी ठार झाले आहेत.
#UPDATE | Jammu and Kashmir: Two more unidentified terrorists killed in the Shopian encounter, police say. https://t.co/SKhMlhcQA8
— ANI (@ANI) April 11, 2021
ठार झालेले तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
लष्कराने शनिवारी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली होती. दुपारच्या सुमारास शोपियातील हाडीपोरा येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरुच होता. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले.
काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नव्यान दाखल झालेल्या दहशतवादी संघटनेतील तरुणाच मतपरिवर्तन करुन शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या तरूणाच्या वडीलांनीही त्याला शरण येण्यास सांगितले. मात्र, त्याच्या साथीदारांनी तसे होऊ दिले नाही. या घटनेनंतर परिसरात अजूनही शोधमोहिम सुरु आहे. लष्कराने आतापर्यंत १० दहशतवाद्यांना ठार केले असून पुलवामातील कारवाईत दोन दहशतवादी ठार केले.