बहुजननामा ऑनलाईन टीम – James Cameron | सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती म्हणजे ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची. अवतारच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई केली होती. त्याचे रेकॉर्ड तब्बल दहा वर्षांनी मार्वेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडले होते,. तर त्या चित्रपटाचा सिक्वेन्स आल्याने अवतारचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत एक मजेशीर खुलासा चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केला आहे. (James Cameron)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जेम्स कॅमेरून यांचा अवतार पहिला भाग 2 तास 42 मिनिटांचा होता, तर आता अवतार द वे ऑफ वॉटर हा 3 तास 12 मिनिटांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिमेकडील देशात चित्रपटांमध्ये मध्यंतर नसतो. मात्र, भारतातील प्रत्येक चित्रपटात मध्यंतर पाहायला मिळतो. यावरूनच जेम्स यांना एक अनोखा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मजेशीर असे उत्तर जेम्सने दिले होते. (James Cameron)
मुलाखतीदरम्यान जेम्सला विचारण्यात आले होते की, “प्रेक्षकांनी चित्रपट सुरू असताना टॉयलेटला कधी जावं?” यावर खुलासा करताना जेम्स म्हणाले की, “प्रेक्षक चित्रपट सुरू असताना कधीही टॉयलेटला जाऊ शकतात. त्याच्यासाठी एक विशिष्ट अशी वेळ नसते. हा चित्रपट सुरू असताना जर प्रेक्षक उठून टॉयलेटला गेला तर त्याचे काही सीन मिस होऊ शकतात जे पाहण्यासाठी पुन्हा त्याला संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल. माझ्या मते चित्रपटाच्या लांबीचा कधीही विचार करू नये. मी माझ्या मुलांसोबत बसून एक एक तासाचे पाच टीव्ही शोज सलग पाहू शकतो. त्यामुळे चित्रपट पाहताना उठून टॉयलेटला जाणे हे अगदी साहजिक आहे”. ‘अवतार 2’ हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- James Cameron | james cameron answers when people should use washroom while watching avatar the way of water
हे देखील वाचा :
Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर
Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत
Pune Crime | पुण्यात रस्त्याच्या कामात 9 कोटींचा घोटाळा; प्रोजेक्ट मॅनेजरवर FIR