• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मौत का कुवा ! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत, 2 दिवसांत दोन अपघात; मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी

by Jivanbhutekar
February 14, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
car accident

जालना : बहुजननामा ऑनलाईन – दोन दिवसांपूर्वी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना जामवाडी येथे घडली होती. यानंतर आज (रविवार) पहाटेच्या सुमारास आणखी एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार या विहिरीत पडली. यामध्ये मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेसहा वाजता झाला. दोन दिवसांत दोन अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

आरती गोपाल फांदडे (वय-30) आणि माही गोपाल फांदडे (वय-4 रा. सिंगडोह, ता. मानोरा, जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या माय-लिकींची नावे आहेत. तर गोपाल विठ्ठल फांदडे (वय-35), वेदिका फांदडे (वय- दीड वर्ष) आणि जय गुणवंत वानखेडे (वय-17 रा. देवठाणा ता. मानोरा, जि. वाशीम) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फांदडे कुटुंबीय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद-देऊळगाव राजा मार्गावरुन जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरुन अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. या अपघातात आरती फांदडे आणि चार वर्षाच्या माहीचा मृत्यू झाला.

जखमी व्यक्तींना तातडीने जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. रस्ता वळणदार असल्याने चालकाला वळणावर असलेली ही विहिर दिसत नाही. त्यामुळे हे अपघात झाले. वळणावर असलेली ही विहिर धोकादायक बनली असून अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Tags: Aarti Gopal FandadeaccidentcarCar Driverdriver lost controlGopal Vitthal FandadejalnaJay Gunwant WankhedeMahi Gopal FandadeVedika FandadeWellअपघातआरती गोपाल फांदडेकारकार चालकगोपाल विठ्ठल फांदडेजय गुणवंत वानखेडेजालनामाही गोपाल फांदडेविहिरविहीरवेदिका फांदडे
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : … कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

Next Post

जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त, ‘पुलवामा’च्या पार्श्वभुमीवर दहशतवाद्यांचा कट अयशस्वी

Next Post
security forces

जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त, 'पुलवामा'च्या पार्श्वभुमीवर दहशतवाद्यांचा कट अयशस्वी

Scorpio
क्राईम

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याचा...

Read more
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
Women's Day Special

Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

March 6, 2021
bribe

15 हजार व ‘खंबा’ मागणारा चोरगे ACB च्या जाळ्यात !

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

6 days ago

‘धूम्रपान आणि ‘तंबाखू’चे सेवन तुम्ही तात्काळ का सोडले पाहिजे ?; जाणून घ्या कारण

4 days ago

पोस्टमॉर्टमसाठी टेबलवर ठेवला होता मृतदेह, हालू लागले हात – अंगावर उभे राहिले काटे आणि…

3 days ago

LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

5 days ago

डोक्यावर टोपली घेत प्रियांका गांधींनी तोडली चहाची पाने; पाहा फोटो

4 days ago

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat