बहुजननामा ऑनलाइन टीम – मॉर्निंग वॉक करत परत जात असताना एका अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेनं दोन महिला जागीच ठार झाल्या. सदर चारचाकीनं मागून त्यांना धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. पाचोरा तालुक्यातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेश दारासमोर गुरुवारी पहाटे 5.30 मिनिटांनी ही घटना घडली.
मनीषा साहेबराव पाटील (वय 50) आणि अनिता सहादु पाटील (वय 48) अशी मृत महिलांची नावं आहेत. सदर दोन्ही महिला या मॉर्निंग वॉक करून परत जात होत्या, यावेळी ही घटना समोर आली.
सदर महिलांना एका चारचाकीनं मागून धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, त्या दोघीही जागीच ठार झाल्या. एका महिलेला सदर चारचाकीनं 50 मीटरपर्यंत फरपटत नेलं तर दुसरी महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. पाचोरा पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल मोरे, रामदास चौधरी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.