Jalgaon Crime News | पत्नी कामावर गेल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – जळगावमध्ये (Jalgaon Crime News) पुन्हा एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या रिक्षाचालकाने जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीच नव्हते. या रिक्षाचालकाची पत्नी मुलीला सोबत घेवून कामाला गेली होती. तर त्यांचा मुलगा हा घराबाहेर खेळत होता. हीच संधी साधून त्याने आत्महत्या केली. गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याने हि आत्महत्या केली. दत्तु नामदेव चौधरी Dattu Namdev Chaudhary (वय 38) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात (Shanipeth Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव (Jalgaon Crime News) जिल्ह्यातील कांचन नगर या ठिकाणी मृत दत्तू चौधरी हे पत्नी, मुलगी व मुलासह राहत होते. ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी दत्तू यांची पत्नी मुलीला घेवून सकाळीच केटरिंगच्या कामाला निघून गेली होती. तर दत्तू आणि त्यांचा मुलगा हे दोघेच घरी होते. यानंतर त्यांचा मुलगादेखील घराबाहेर गल्लीत इतर मुलांसोबत खेळण्यासाठी निघून गेला. यानंतर दत्तू चौधरी यांनी घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी घरातील गॅस सिलेंडरवर उभे राहून गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला.
यानंतर काही वेळाने दत्तू यांचा मुलगा खेळून झाल्यानंतर घरी परतला.
त्यावेळी त्याला आपले वडील गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले.
यानंतर या घटनेची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आली.
यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी, अभिजीत सैंदाणे व किरण वानखेडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला. यानंतर चौधरी यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. मात्र दत्तू चौधरी यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दत्तू चौधरी यांच्या माघारी पत्नी मोनाली, मुलगा निखील (वय 12 वर्ष) व मुलगी परी (वय 9 वर्ष) असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Jalgaon Crime News | rickshaw driver ends life in kanchan nagar jalgaon
हे देखील वाचा :
Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला
Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा
Comments are closed.