Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा

Pune Hadapsar News | Shobha yatra by many social organizations on the occasion of Gudhipadwa festival in Hadapsar

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  – Pune Hadapsar News | हडपसर मध्ये आज गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांनी शोभा यात्रेचे आयोजन केले होते. हडपसर, ससाणे नगर, हांडेवाडी, सातववाडी, गाडीतळ आदि परिसरातून वाजत गाजत व ढोल ताशांच्या गजरात शोभा यात्रेने चैतन्य निर्माण केले होते. (Pune Hadapsar News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सातववाडी येथील शिवसमर्थ व सिद्धेश्वर संस्थेने आंतरराष्ट्रीय भरड वर्षानिमित्त भरड धान्य गुढी शोभायात्रा याद्वारे भरडधान्याचे आहारातील महत्त्व विशद केले. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक विशेष आकर्षण होते. याचे आयोजन मनीषा वाघमारे,पार्थ वाघमारे व डॉ. शंतनू जगदाळे यांनी केले. जनसेवा न्यास यांच्या वतीने ससाणे नगर ते डीपी रोड अशी महिलांची दुचाकी वाहन रॅली आयोजित केलेली होती.शेकडो महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. याचे आयोजन माधव राऊत, भूषण तुपे,चेतन कुलकर्णी आदींनी केले होते. गाडीतळ ते गोंधळेनगर या मार्गावरून हिंदू नववर्ष स्वागत समिती,हडपसर यांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. (Pune Hadapsar News)

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ हे या शोभायात्रेच्या आकर्षण होते. याचे आयोजन मनोहर देशमुख यांनी केले होते. सकल हिंदू समाज व श्री प्रभू राम भक्त मित्रपरिवार यांच्यावतीने श्रीराम मंदिर काळेपडळ ते सातव नगर अशी शोभायात्रा काढण्यात आली.मोठ्या संख्येने नागरिक या मध्ये सहभागी झालेले होते. कलाकार गुढी आयोजन समितीच्या वतीने कलाकार गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन केले होते. हडपसर भाजी मंडई ते विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह या मार्गावर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शोभायात्रा आयोजित केली होती.

 

 

Web Title : Pune Hadapsar News | Shobha yatra by many social organizations on the occasion of Gudhipadwa festival in Hadapsar

 

हे देखील वाचा :

Pune Political News | कसबा पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने प्रथमच आमने-सामने, हस्तांदोलन करुन म्हणाले…

Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस