नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आता आधार कार्डमुळे रेल्वेने प्रवास करणे सोपे होणार आहे. इंडियन रेल्वे केटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) ट्रेन तिकीट बुकींगसाठी आधार व्हेरीफिकेशन केल्यानंतर तुम्हाला 12तिकीट बुक करण्यासाठी सुविधा देतं. ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही. परंतु आधार कार्डशिवाय तुम्ही फक्त 6 वेळा तिकीट बुक करू शकता.
असे करा आधार अपडेट
– IRCTC ने आपला आधार नंबर लिंक करण्यासाठी युजरला आपल्या IRCTC अकाऊंटमध्ये जावं लागतं.
– यानंतर तुम्ही माय प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट आधारवर क्लिक करून अपडेट करू शकता.
– यानंतर आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो.
– हा ओटीपी IRCTC वर येऊन एन्टर करा.
– अशा प्रकारे तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक होतो.
– यानंतर तुम्ही एका महिन्यात 12 तिकीट बुक करू शकता.
तात्काळ तिकीट बुकींग
तात्काळ तिकीट, प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी बुक केलं जाऊ शकतं. एसी क्लासचं तात्काळ तिकीट 10 वाजल्यापासून बुक केलं जाऊ शकतं. तर नॉन एसी क्लासचं तात्काळ तिकीट सकाळी 11 वाजल्यापासून बुक केलं जाऊ शकतं.
जर तुमच्याकडे तात्काळचं कंफर्म तिकीट असेल तर कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळत नाहीत. जर तुमच्याकडे तात्काळचं आरएसी किंवा वेटींग तिकीट असेल तर ट्रेनच्या शेड्युल डिपार्चर टाईमपासून 30 मिनिट आधी कॅन्सल केल्यावर रिफंड मिळू शकतो.
तात्काळ तिकीटासाठी द्यावा लागणार एक्स्ट्रा चार्ज
रेल्वेने तात्काळ तिकीटनुसार, स्लीपर क्लाससाठी ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये शुल्क ठेवलं आहे. एसी चेअर कार तिकीटसाठी भारतीय रेल्वेकडून लावण्यात आलेलं शुल्क 125-225 रुपये आहे. तुम्ही तात्काळ तिकीट IRCTCची वेबसाईट https://www.irctc.co.in किंवा रिझर्वेशन काऊंटरवरवरूनही बुक करू शकता.