नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने रेल्वे प्रवाशांना आणखी एक भेट दिली आहे. आयआरसीटीसीने नवीन पेमेंट गेटवे आयटीसीटी-आयपे लाँच केले आहे, ज्यामध्ये ट्रेन प्रवांशाना पेमेंट करणे सोपे असून आता ट्रेन तिकिट कॅन्सल करताच ताबडतोब रिफंड मिळेल. आयआरसीटीसीने आयपे गेटवे सुविधेसह ऑटो पे ची सुविधा दिली आहे, ज्यामध्ये ट्रेन प्रवाशांना पेमेंट करणे सोपे जाणार आहे.
तिकिट कॅन्सल करताच ताबडतोब तुम्हाला युपीआय बँक खाते किंवा इतर पेमेंट साधनांद्वारे डेबिटची परवानगी द्यावी लागेल. आयटीसीटी-आयपे द्वारे पेमेंट करण्यासाठी यूजर्सला आपल्या युपाआय बँक अकाऊंटचे डेबिट कार्ड किंवा अन्य पेमेंट फॉर्मच्या वापरासाठी परवानगी आणि डिटेल द्यावे लागतील. यूजर्स आयआरसीटीसी भविष्यातील ट्रांजक्शनसाठी सुद्धा डिटेल्सचा वापर करू शकते.
आयपे गेटवेच्या ऑटो पे च्या अंतर्गत तुम्हाला रेल्वे तिकिट बुक करणे सोपे होणार आहे, सोबतच पेमेंट सुद्धा वेगाने होते. पेमेंट वेगाने झाल्याने प्रवाशांना कन्फर्म तिकिट घेण्यात सुद्धा सवलत मिळेल. तत्काळ तिकिट बुक करणार्यांसाठी हे आणखी सोपे माध्यम आहे.
यूजर्सच्या वेळेची होईल बचत
सध्या रेल्वे प्रवाशांना तिकिट कॅन्सल केल्यानंतर रिफंडसाठी 2 ते 3 दिवस वाट पहावी लागते. परंतु आता असे होणार नाही. आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून तिकिट बुक केल्यावर आयआरसीटीसी आयपेद्वारे इन्स्टंट रिफंड मिळेल. आयआरसीटीसीनुसार, ऑटोपे अॅप फॅसिलिटीसाठी यूजर्सला तिकिट बुक करण्यास सुविधा होईल आणि तिकिट कॅन्सल करण्याच्या स्थितीत रिफंड प्रक्रिया सुद्धा सहज होईल. नव्या पेमेंट गेटवेमुळे यूजर्सच्या वेळेची बचत होईल.