नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी होळीनिमित्त भारतीय रेल्वेने अपेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली असून सणाला समोर ठेवून त्याप्रकाराने नियोजन केले गेले आहे. गर्दी कमी ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी होळी दरम्यान पुण्याहून पटना, गांधीधामपासून भागलपूर पर्यंत अनके शहरात स्पेशल ट्रेन चालणार आहे. ५ मार्चपासून पुणे ते पटना ट्रेन चालू होणार असून जर तुम्हाला रिजर्वेशन मिळाले नाही तर ही ट्रेन तुम्हाला एक चांगला उपाय असणार आहे. त्यासाठी या गाड्यांचे मार्ग, टाईमिंग आणि बाकीची माहिती खाली दिली आहे.
4 Holi special trains between Pune and Patna. pic.twitter.com/UIjtnPIlcv
— Central Railway (@Central_Railway) February 19, 2020
५ मार्चला सकाळी १० वाजता गाडी क्रमांक ०३२५३ पटनापासून रवाना होईल. जी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. तीन ट्रेन शुक्रवारी ६ मार्चला रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल, जी तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७ वाजता पटनाला पोहोचेल. १२ आणि १३ मार्चला पण हेच नियोजन असणार आहे. या गाड्या अहमदनगर, बेलापुर, खांडवा, सतना, मणिकपुरसह इतरही स्टेशनवर थांबणार असून होळी स्पेशल गाडी ०३२५४ साठी २० फेब्रुवारी २०२० पासून रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुकिंग करू शकता.
होली विशेष रेलगाड़ियां-2020 pic.twitter.com/8sIyriVNuf
— Northern Railway (@RailwayNorthern) February 10, 2020
पश्चिम रेल्वेबाबत होळी स्पेशल ट्रेन गांधीधाम ते भागलपूर दरम्यान धावेल. पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गांधीनगर-भागलपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी सहा मार्चपासून सुरू होणार आहे. जी अहमदाबाद, नांदेड, भवानी, कोटा यासह अनेक स्थानकांवर थांबेल. या गाड्या चालवल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
WR to run Holi special train between Gandhidham & Bhagalpur #WRUpdates pic.twitter.com/dVTS6dBtPO
— Western Railway (@WesternRly) February 18, 2020