मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आयपीएलच्या १४व्या सिजनला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. रविवारी बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार पहिला सामना ९ एप्रिल तर शेवटचा सामना ३० मे रोजी खेळवला जाणार आहे. या मोसमाच्या सगळ्या मॅच या न्यूट्रल ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. म्हणजेच पहिल्यांदाच या आयपीएलमध्ये कोणत्याच टीमला त्यांच्या घरच्या मैदानात सामने खेळायला मिळणार नाहीत. त्यामुळे या निर्णयाचा सगळ्या मोठा धक्का चेन्नई सुपर किंग्स या टीमला बसणार आहे.
या सिजनमध्ये चेन्नईच्या सगळ्या मॅच या मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि कोलकात्यामध्ये होणार आहेत. चेन्नई या पूर्ण सिजनमध्ये 14 पैकी 10 मॅच अशा मैदानांवर खेळणार आहे जिकडे स्पिन बॉलिंगला मदत होत नाही. आयपीएल २०२१ साठी झालेल्या लिलावात चेन्नईने त्यांची स्पिन बॉलिंग मजबूत केली होती. पण दिल्लीतल्या 4 मॅच वगळता इतर कुठेही त्यांच्या स्पिनरना फार करिष्मा दाखवता येणार नाही.
मुंबईचं वानखेडे स्टेडियम, बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि कोलकात्याच्या इडन गार्डनवर स्पिन बॉलरला अजूनपर्यंत आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. तसेच हे सगळे स्टेडियम छोटे असल्यामुळे बॅट्समन स्पिन बॉलिंगवर जास्त आक्रमक खेळ करतात. चेन्नईने यंदाच्या २०२१ च्या लिलावात मोईन अली आणि कृष्णप्पा गौतम या दोन स्पिनरना विकत घेतले होते. आता धोनी या दोन्ही स्पिनरचा कशा प्रकारचा वापर करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चेन्नईची सुपर किंग्सची संपूर्ण टीम
महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, सॅम करन, जॉश हेजलवूड, इमरान ताहिर, फाफ डुप्लेसी, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, मिचेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, नारायण जगदीशन, केएल आसिफ, लुंगी एनगिडी, साई किशोर, मोइन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, एम हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, के हरी निशांत.