IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीनंतर टीमच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली आयपीएलमधून निवृत्ती

बहुजननामा ऑनलाइन टीम – चेन्नई सुपर किंग्जचा ऑल-राऊंडर शेन वॉटसननेही आयपीएलमधून(IPL 2020) संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेन वॉटसनने सर्व क्रिकेट फॉर्मेट्समधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेन वॉटसनने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. वॉटसनने लिहिले, की निवृत्ती घेण्याचा हा निर्णय खूप कठीण असणार आहे पण मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
पुढे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, हे अद्भुत स्वप्न जगण्यासाठी मी खरोखर कृतज्ञ आहे शेन वॉटसन याने सर्वांचे आभार मानले आहेत. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूने आता फ्रँचायझी क्रिकेटपासून(IPL 2020) स्वत: ला दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
This closing chapter is going to be so hard to top, but I am going to try.
I truly am forever grateful to have lived this amazing dream.
Now onto the next exciting one…#thankyou https://t.co/Og8aiBcWpE— Shane Watson (@ShaneRWatson33) November 3, 2020
शेन वॉटसन 2018 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जबरोबर सामील होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही खेळला आहे. 2018 च्या अंतिम सामन्यात शेनच्या शतकी खेळीने जिंकून दोन वर्षांच्या बॅननंतर चेन्नईने पुनरागमन केले होते. 2019 च्या अंतिम सामन्यातही त्याने दुखापत होऊनही दमदार खेळ केला; परंतु मुंबई इंडियन्सने एका विकेटने पराभूत करून आपले चौथे विजेतेपद जिंकले.
फ्रँचायझी क्रिकेट आणि चेन्नई सुपरकिंग्सला निरोप घेताना वॉटसन खूपच भावनिक झाला होता. 39 वर्षीय वॉटसनने ऑस्ट्रेलियाकडून 58 कसोटी, 190 वनडे आणि 58 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलच्या 145 सामन्यांत चेन्नईकडून 43 सामने खेळणार्या या खेळाडूचा चालू सीजन निराशजनक राहिला.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 83 धावांच्या खेळाव्यतिरिक्त वॉटसन सीएसकेला चांगली सुरुवात देऊ शकला नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी मैत्रीपूर्ण संबंध आणि खेळाविषयीची त्यांची सखोल समज लक्षात घेता असे होऊ शकते की, 2021 मध्ये वॉटसन स्टाफचा सदस्य होईल आणि चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा उभे करण्यासाठी माहीची साथ देईल.
Comments are closed.