बहुजननामा ऑनलाइन : आयएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना राउज एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. यादरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. परंतु सीबीआयच्या या मागणीवर न्यायाधीशांच्या रागाचा पारा चढला आहे. न्यायाधीश म्हणाले की आपण (सीबीआय) पहिल्याच दिवशी १५ दिवसांची मागणी का नाही केली ? आपण चिदंबरम यांना रोज किती प्रश्न विचारता ?
कोर्टाच्या विचारलेल्या या प्रश्नावर सीबीआयने सांगितले की, आम्ही दररोज ८ ते १० तासांची चौकशी करतो. यावर न्यायाधीश म्हणाले की आपण दहा तासांची विचारपूस करता आणि मला एवढे कमी कागदपत्रे देता ! राउज एवेन्यू कोर्टाने 2 सप्टेंबरपर्यंत चिंदबरम यांचा ताबा सीबीआयकडे दिला आहे. सीबीआयने कोर्टात सांगितले की दुसऱ्यांदा रिमांड वाढविण्यात आल्याने अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात. कोठडीदरम्यान चिदंबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे. सीबीआय या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु ताब्यात घेतल्यास अनेक महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळू शकते.
तथापि, चिदंबरम यांच्या वकिलांनी ५ दिवसाच्या सीबीआय कोठडीला विरोध केला. चर्चेदरम्यान कोर्टाला सांगण्यात आले की, आरोपीला २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत सीबीआय कोठडीत रहायच आहे आणि पोलिस तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत. चिदंबरम यांच्या वकिलांनीही तपासात सहकार्य करण्याचे सांगितले. कोर्टाने म्हटले आहे की सीबीआयची या प्रकरणाची कस्टडी चौकशी करण्याची मागणी न्याय्य आहे, त्यामुळे सीबीआयला सोमवारपर्यंत कोठडी देण्यात येत आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेपासून अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) ५ सप्टेंबरपर्यंत अंतरिम सवलत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी वाढविली. त्याचबरोबर ईडीच्या अटकेविरोधात चिदंबरम यांच्या याचिकेवर निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला आहे. आता सर्वोच्च न्यायालय ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणातील चिदंबरम यांच्या अग्रिम जामीन अर्जावर निकाल देईल.