बहुजननामा ऑनलाइन टीम – वीजग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज (free-electricity-100-units) देण्याच्या आधीच्या घोषणेवर आपण आजही ठाम असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (energy minister Nitin Raut) यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र, लॉकडाउनच्या काळात आलेल्या वाढीव बिलांबाबत माफी वा सवलत देता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.
लॉकडाउन काळातील वाढीव बिले माफ करणार का असे विचारले असता ते म्हणाले की, वीजग्राहकांनी मीटर रीडिंगप्रमाणे बिले भरली गेलीच पाहिजेत. मागच्या सरकारने कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळे आजची सरकाची स्थिती वीजबिल माफीसारखी नाही. ऊर्जा विभागाने 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याबाबत नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल कोरोनामुळे आला नाही. पण ही वीज माफ केल्याचे तुम्हीही पाहाल, तसेच आतापर्यंत 69 टक्के ग्राहकांनी बिले भरली आहेत. उर्वरित 31 टक्के ग्राहक डिसेंबर-जानेवारीपर्यंत भरतील असे ते म्हणाले. दरम्यान, भाजप नेत्यांना वाढीव बिलांबाबत आक्षेप असेल तर त्यांनी माझ्या कार्यालयाकडे ती द्यावीत. मी त्यांची तपासणी करेन. पण बिले वाढीव नसल्याचे सिद्ध झाले, तर ती बिले भरू, असा शब्द भाजप नेत्यांनी द्यावा, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.