बहुजननामा ऑनलाइन : आपल्या एका पत्नीसोबत संसार करता – करता, तिच्या अपेक्षा पूर्ण करताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. परंतु इंडोनेशियन एका व्यक्तीने आपल्या दोन्ही प्रेयसींबरोबर लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हाईस इंडोनेशियाच्या मते इंडोनेशियातील एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मैत्रिणींसोबत लग्न केले कारण त्यांना या दोघांनाही दुखवायचे नव्हते.
१७ ऑगस्ट रोजी इंडोनेशियातील एयरतारप येथे हे लग्न झाले. त्या व्यक्तीने दोन्ही वधूंच्या कुटुंबीयांना हुंड्यासाठी मोठी रक्कमही दिली. इंडोनेशियात वधूच्या कुटुंबाला हुंडा देण्याची प्रथा आहे. वर वधूची चांगली काळजी घेईल, असा विश्वास मानला जातो. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार या दोन महिलांना एकमेकांशी कोणतीही अडचण नाही. दोघेही या लग्नामुळे आनंदी आहेत.
व्हिडिओमध्ये दाखविलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तथापि, व्हिडिओमधील व्यक्ती आपली प्रतिज्ञा योग्य प्रकारे बोलु शकत नाही. दुसर्या प्रयत्नात तो आपली वचनं घेण्यास सक्षम ठरतो. त्यापैकी एकही दुःखी होऊ नये म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचे त्या व्यक्तीने स्थानिक माध्यमांना सांगितले. इंडोनेशियात ही पहिली वेळ नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीने दोन मुलींचे लग्न केले असेल. लोम्बुकमधील एका व्यक्तीने २०१७ मध्ये दोन मुलींशी लग्न केले आणि हुंडा म्हणून वधूच्या कुटूंबाला सोने आणि रोख रक्कम दिली होती.