बहुजननामा ऑनलाइन – सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध डान्सिंग रिॲलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (indias best dance) मध्ये गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री आणि बेली डान्सर नोरा फतेही या जज च्या भूमिकेत दिसत आहेत. परंतु लवकरच नोराला आता या कार्यक्रमातून बाहेर जावे लागणार आहे.
मलायका अरोराला कोरोना झाल्यामुळे नोराला काही काळ या शोचा जज म्हणून नेमण्यात आले. गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या नृत्यदिग्दर्शका सोबत नोरा या शो मध्ये जज होती. पण नोरा इथून पुढे या शो मध्ये दिसणार नाही. मलायका अरोरा हिला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता आणि त्यानंतर तिला शोमधून ब्रेक घ्यावा लागला. पण आता ती कोरोनामधून बरी झाली आहे. कोरिओग्राफर गीता कपूर यांना नोराच्या वापसीविषयी उत्कंठा व्यक्त केली आहे.
तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये गीता कपूर नोराला मोठ्या प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. फोटोसोबत गीता कपूर यांनी लिहिले आहे की, खूप कमी दिवसात तू हे कसं केलंस पण मलायका च्या जागी तू हे खूप छान काम केलेस तुझी आठवण येत राहील. या आठवड्याच्या शेवटी नोरा चा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे.