नवी दिल्ली : इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा 4,600 कोटी रूपयांचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) याच महिन्यात येऊ शकतो. हा रेल्वेच्या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीचा पहिला आयपीओ असेल. आयआरएफसीने जानेवारी 2020 मध्ये आयपीओसाठी कागदपत्रांचा मसुदा जमा केला होता.
अँकर गुंतवुणकदारांकडून सुद्धा पैसे जमवणार आयआरएफसी
आयआरएफसीचे चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अमिताभ बॅनर्जी यांनी म्हटले की, मोठी शक्यता आहे की, हा आयपीओ या महिन्याच्या तिसर्या आठवड्यापर्यंत येईल. परंतु जर बाजाराची स्थिती चांगली राहिली नाही, तर आम्ही तो जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात सुद्धा आणू शकतो. सरकार या आयपीओमध्ये अँकर गुंतवणुकदारांकडून सुद्धा पैसा जमवण्याची तयारी करत आहे.
बाजार सूत्रांनी सांगितले की, आयपीओतून सुमारे 4,600 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. आयपीओमध्ये अँकर गुंतवणुकदारांना जोडण्याबाबत बॅनर्जी म्हणाले, हा एक विश्वसनीय बाजार आहे. अँकर गुंतवणुकदार याबाबतीत आश्वस्त असतील की, त्यांना नेहमीच्या बोली प्रक्रियेशिवाय आपल्या वाट्याचे शेयर मिळण्यात कोणतीही अडचण असणार नाही.
178.20 कोटी शेयरचा असेल आयपीओ
त्यांनी म्हटले, याशिवाय त्यांना विनाबोली मार्गातील आयआरएफसीमध्ये गुंतवणुक करण्यात मदत मिळेल. याशिवाय बाजारात बाहेर उभे असलेल्या अन्य गुंतवणुकदारांना सुद्धा यातून विश्वास मिळेल. हा आयपीओ 178.20 कोटी शेयर्सचा असेल. यामध्ये 118.80 कोटी नवे शेयर जारी करण्यात येतील. तर सरकार 59.40 कोटी रूपयांची विक्री सादर करेल.
आयपीओची रक्कमेच्या वापराबाबत त्यांनी म्हटले की, यापैकी 10 टक्के रक्कम कंपनीच्या वहीखात्यात टाकली जाईल, ज्यातून तिचे नेटवर्थ वाढेल. याशिवाय पाच अक्के रक्कम सरकारच्या खजिन्यात जाईल. बॅनर्जी म्हणाले, हा आयपीओ खुप चांगला असेल, याची शक्यता खुप चांगली आहे.