बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेत मंजूर झालेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने उद्या म्हणजे बुधवारी संपूर्ण देशभरात संप पुकारला आहे. उद्या देशातील सर्व डॉक्टर संपावर राहणार असल्यामुळे रुग्णसेवा कोलमडून पडण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) जागेवर आयोग स्थापन करण्याची वाट मोकळी करणारे आयोग विधयेक लोकसभेत सोमवारीच मंजूर करण्यात आले आहे. मात्र देशभरातील डॉक्टरांनी या विधेयकाला पूर्णपणे विरोध केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आयएमएने देशभर संप पुकारला आहे.
मात्र देशात दिवसाला अनेक अपघात आणि गंभीर आजारांचे लाखो रुग्ण असतात. परंतु उद्या देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.