चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – राजमाता जिजाऊ जयंतीदिनाचे औचित्य साधून बामसेफ, मूलनिवासी संघ, मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ, मूलनिवासी विद्यार्थी संघ, मूलनिवासी सभ्यता मंचच्या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने स्थानिक भिवापूर वॉर्डातील वैशाली बुद्धविहारात भारतीय संविधान सन्मान, समर्पण, संवर्धन आणि सुरक्षा (बी.एस-४) हा कार्यक्रम पार पडला.
जय मल्हार प्रतिष्ठानकडून प्रा. बोडखे ‘यशवंत रत्न’ पुरस्काराने सन्मानित
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे जिल्हा महासचिव पंकज जांगडेवार, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य के. के. शेंडे उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, राष्ट्रपिता जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. यानंतर दादाजी वाघमारे, महेंद्र सोरते, निर्विकार खोब्रागडे यांनी क्रांतिगिते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बामसेफचे जिल्हा महासचिव पंकज जांगडेवार यांनी भारतीय संविधान सम्मान, समर्पण, संवर्धन आणि सुरक्षा कार्यक्रमावर माहिती देत अन्य विषयांवरसुद्धा यथोचित मार्गदर्शन केले. तर राज्य कार्यकारिणी सदस्य के. के. शेंडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन अरुण बहादे यांनी केले. प्रास्ताविक एन. आर. खोब्रागडे यांनी केले. तर आभार दादाजी वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.