नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिक्युरिटी गार्ड सह शिपाई भरतीसाठी इंडियन बँकेने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इंडियन बँकेने एकूण ११५ रिक्त पदे जारी केली आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अधिकृत सूचना डाउनलोड करा. इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, महत्वाच्या तारखा, पदांचा तपशील यासह संपूर्ण भरती तपशील वाचले पाहिजेत. पात्र अर्जदार शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : सिक्युरिटी गार्ड सह शिपाई
पदांची संख्या : ११५
वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे असले पाहिजे.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख : ४ ऑक्टोबर, २०१९
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख : ८ नोव्हेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :
इच्छुक उमेदवार www.indianbank.in वेबसाइट मार्फत ४ ऑक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. यानंतर वेबसाइटवरील ऑनलाईन लिंक बंद होईल.
निवड प्रक्रिया :
निवड ऑब्जेक्टिव प्रकारे ऑनलाइन टेस्ट, स्थानिक भाषा चाचणी, फिजिकल फिटनेस टेस्ट यावर आधारित असेल.
Visit : bahujannama.com