नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाने कोरोना व्हायरसची पहिली वॅक्सीन तयार केल्याची घोषणा केल्यानंतर उत्पादन सुद्धा सुरू केले आहे. मात्र काही देशांनी जसे की अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनने रशियाच्या वॅक्सीनकडे शंकेच्या नजरेने पाहिले आहे. मात्र, भारताने रशियाच्या वॅक्सीनवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताने रशियाची वॅक्सीन घेण्याची इच्छा दर्शवली आहे आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले, स्पुतनिक- 5 वॅक्सीनसंदर्भात भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. काही प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. नुकतीच नोंदणी झालेल्या या वॅक्सीनची तिसर्या टप्प्यातील ट्रायल सुद्धा जारी आहे. 45 केंद्रांवर 40,000 पेक्षा जास्त लोकांवर ट्रायल केली जात आहे.
वॅक्सीन लाँचनंतर रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी वॅक्सीनच्या प्रॉडक्शनसाठी भारतासोबत पार्टनरशिपची इच्छा व्यक्त केली होती. लॅटिन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वेतीली देशांनी वॅक्सीनच्या उत्पादनाची इच्छा दर्शवली आहे, असे त्यांनी म्हटले.
दिमित्रीव म्हणाले, वॅक्सीनचे उत्पादन एक खुपच महत्वपूर्ण मुद्दा आहे. आम्ही भारतासोबत पार्टनरशिप करण्यास तयार आहोत. भारत गामेलिया वॅक्सीनचे उत्पादन करण्यास सक्षम आहे. या पार्टनरशिपद्वारे मागणीनुसार वॅक्सीन बनवता येईल. रशिया अंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सुद्धा तयार आहे.
दिमित्रीव यांच्यानुसार, आम्ही रशियासह यूएई, सौदी अरब, ब्राझील आणि भारतात सुद्धा वॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल करू. आम्ही पाचपेक्षा जास्त देशात वॅक्सीनचे उत्पादन करण्याची योजना बनवत आहोत. आमच्या वॅक्सरनची आशिया, लॅटिन अमेरिका, इटली आणि जगाच्या अन्य भागात डिलिव्हरीची खुप मागणी आहे.
रशियाने दोन महिन्यापेक्षा कमी ह्यूमन टेस्टिंगच्यानंतर वॅक्सीन लाँच केली होती. या ट्रायलच्या सुरूवातीचे परिणाम अजून जाहीर केलेले नाहीत. याकारणामुळे अनेक देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले होते की, रशियाने फास्ट ट्रॅक पद्धतीने वॅक्सीन बनवली आहे, जी पहिल्या टप्प्यांमध्ये यशस्वी ठरली आहे.