इंदापूर – बहुजननामा ऑनलाईन – शेतात तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला पत्नी न आल्याचा राग मनात धरून, दोन वर्षाची लहाण मुलगी माझी नाही म्हणत पत्नीला मारहाण करून रात्रीच्या वेळी पत्नी झोपेत असताना दोन वर्षीय चिमूरडीचे तोंड व नाक दाबुन तीच्या हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या नराधम आरोपी बापाला इंदापूर पोलीसांनी अटक केली असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.
इंदापूर तालुक्यातील मौजे वरकुटे बु. करेवाडी येथील एकनाथ धोंडीबा करे यांचे मालकीचे शेतात सकट्या उर्फ चिंटु उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे रा. भांबुरे,ता. कर्जत,जि. अ.नगर हा त्याची पत्नी सोनम व त्याच्या दोन वर्षीय मुलीसह ऊसमजुर म्हणुन कामाला होता. त्यांचेसोबत इतर ऊस कामगारही कोपी करून रहात होते.दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसभर ऊसतोड करून रात्री कोपीवर आल्यावर फीर्यादी यांचे पतीने नेहमीप्रमाणे सोनम यांना ही मुलगी माझी नाही, तुम्हालाही हुंडा मीळु देणार नाहु व मी पण खानार नाही.आज तु माझ्या मागे ऊस तोडायला का आली नाही म्हणुन फिर्यादी यांना लाथा बुक्यानी मारहाण करत धारधार कोयता अंगावर घेवुन धावत होता.
भांडणामुळे फीर्यादी यांचा पती रात्री न जेवता उपाशीच झोपला.पहाटे झोपेत फीर्यादी यांचे अंगाला मुलगी पिला हीचे पाय लागल्याने जाग्या झाल्या असता त्यांचा नवरा सकट्या हा त्याचे दोन्ही हाताने मुलीचे नाक व तोंड दाबत होता. त्यावेळी फीर्यादी यांनी कोपीबाहेर येवुन जोरजोराने कालवा केल्याने बाजुचे कोपीतील इतर लोक जागे झाले तोपर्यंत सकट्या अंधाराचा फायदा घेवुन फरार झाला होता. याबाबत मयत मुलीची आई सोनम सकट्या उर्फ चिंटु उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान काळे यांनी सकट्या उर्फ चिंटु उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे रा.भांबुरे, ता.कर्जत, जि. अ.नगर याचे विरूद्ध २३ नोव्हेंबर २०२० रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या हत्येची खबर दीली होती.
घटना घडली त्यावेळी मुलीच्या मृृत्युमुळे आईची बोलण्याची मानसिकता नव्हती.त्यामुळे त्यांनी दि.१७ डिसेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात येवुन तीचा पती याने तीची दोन वर्षीय लहाण मुलगी पिला हिचे नाक, तोंड दाबुन तीला जीवे ठार मारल्याची फीर्याद दील्याने आरोपीविरूद्ध लहाण मुलीची हत्या केल्याचा ३०२ चा गुन्हा दाखल केला होता.सदर गून्ह्यातील फरार आरोपीला पकडण्याची कामगीरी पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अपर पो.अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पो.अधिकारी नारायण शिरगावकर,इंदापूर पो.निरिक्षक नारायण सारंगकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक अजित जाधव ,पो.ना.दिपक पालखे, पो.काँ. अमित चव्हाण, प्रविण शिंगाडे, विनोद काळे, मामा चौधर, गजेंद्र बिरलिंगे, विठ्ठल नलवडे, विक्रम जमादार, विनोद मोरे यांचे पथकाने करून आरोपीला बेड्या ठोकल्या असुन पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक सिमा मुढे या करत आहेत.