नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंका (IND vs SL) मध्ये वनडे आणि टी20 सीरीजचे सुधारित शेड्यूल जारी केल्याच्या एक दिवसानंतरच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) ने सीरीजच्या मॅचेसच्या नवीन वेळापत्रकाची सुद्धा घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) नुकताच दुजोरा दिला होता की श्रीलंकन क्रिकेट टीमच्या (Sri Lankan cricket team) शिबिरात कोविड-19 च्या प्रकोपानंतर भारत आणि यजमान श्रीलंकेमध्ये सफेद चेंडूची वनडे आणि टी20 सीरीज पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, ही सीरीज रद्द करण्यात आली नाही. ही सीरीज 13 च्या ऐवजी आता 18 तारखेला खेळली जाईल. IND vs SL slc shares new timings for odi and t20i matches after covid 19 outbreak
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तर, सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले.
आणि सांगितले की, भारत आणि श्रीलंकेत होणार्या मॅचची वेळ सुद्धा बदलण्यात आली आहे.
या पोस्टनुसार, सीरीजच्या वनडे मॅच आता 2.30 वाजताच्या ऐवजी दुपारी 3.00 वाजतापासून खेळल्या जातील. तर, टी20 मॅच रात्री 8.00 वाजतापासून सुरू होतील.
यापूर्वी दोन्ही देशांमध्ये टी20 सीरीज सायंकाळी 7.00 वाजतापासून सुरू होणार होत्या.
श्रीलंका दौर्यावर गेलेली भारतीय टीम दुसरी आहे, जिचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा सारखे दिग्गज भारतीय खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील या भारतीय टीमचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे.
तर, भुवनेश्वर कुमार उप कर्णधार आहे.
मोठे कारण समोर आले
नुकतेच कोविड-19 च्या प्रकोपामुळे दोन्ही टीममधील सीरीज स्थगित केल्यानंतर हा बदल पुन्हा झाला आहे. बीसीसीआय सचिव जय अमित शाह यांनी मुख्य भारतीय क्रिकेट बोर्ड (Indian Cricket Board) द्वारे लिमिटेड ओव्हर्सचा सुधारित कार्यक्रम जाहीर केल्यानंतर म्हटले होते की,
आमची मेडिकल टीम श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या डॉक्टरांच्या टीमसोबत सतत संपर्कात आहे.
आणि सोबतच सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम आपल्या श्रीलंका दौर्याची शुरुवात तीन मॅचच्या वनडे सीरीजसोबत करेल.
पहिली वनडे मॅच 18 जुलैपासून खेळली जाईल.
यानंतर भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान 25 ते 29 जुलैपर्यंत तीन मॅचेसची टी20 सीरीज खेळवली जाईल. वनडे आणि टी20 च्या सर्व मॅच कोलंबोच्या प्रसिद्ध आर प्रेमादासा स्टेडियममध्ये खेळवल्या जातील.
Web Title : ind vs sl slc shares new timings for odi and t20i matches after covid 19 outbreak
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update