बहुजननामा ऑनलाईन – IND vs BAN | भारत आणि बांगलादेश संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेला मुकणार आहे. बीसीसीआयने यानंतर अधिकृत माहिती दिली आहे. शमी या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून उमरान मलिकचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs BAN)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
🚨 NEWS 🚨: Umran Malik to replace Mohd. Shami in India’s ODI squad for Bangladesh series. #TeamIndia | #BANvIND
Details 🔽https://t.co/PsDfHmkiJs
— BCCI (@BCCI) December 3, 2022
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीदरम्यान सराव सत्रात वेगवान गोलंदाज शमीच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहे. दुखापत मोठी असल्यामुळे त्याला ही संपूर्ण मालिका खेळता येणार नाही. त्याच्या जागी उमरान मलिकला संघात स्थान देण्यात आले आहे. (IND vs BAN)
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत उमरान टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात त्याने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले होते. एकदिवसीय मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत तीन विकेट घेतल्या होत्या. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
Snapshots from #TeamIndia's first training session in Bangladesh ahead of the three-match ODI series.#BANvIND
📸 – BCB pic.twitter.com/AXncaYWeup
— BCCI (@BCCI) December 2, 2022
भारत – बांगलादेश मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 4 डिसेंबर
दुसरा एकदिवसीय सामना – 7 डिसेंबर
तिसरा एकदिवसीय सामना – 10 डिसेंबर
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली,
रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद,
अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेशचा वनडे संघ – लिटन दास, अनामुल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो,
महमुदुल्लाह, नुरुल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद,
हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.
Web Title :- IND vs BAN | umran malik was given a chance when mohammad shamis replacement was announced for the odi series against bangladesh
हे देखील वाचा :
Joe Root | चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अनोखी शक्कल; Video व्हायरल
Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना