न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने नुकतीच पृथ्वीच्या बाहेरील म्हणजेच ब्रह्मांडाची काही अद्भुत छायाचित्रे सोशल मीडियावर शेयर केली आहेत. पाहता क्षणीच ही छायाचित्रे अविश्वसनीय वाटतात, परंतु ती पाहून तुम्ही त्यांच्या सौंदर्याने आवाक होऊन जाऊ शकता.
Right #now Chandra is studying a star in #Taurus. Nearby in the sky a star known as T Tauri is illuminating the variable nebula NGC 1555. A variable nebula is a reflection nebula that fluctuates in brightness due to changes in the star whose light it reflects. pic.twitter.com/PIhCM2e0OO
— Chandra Observatory (@chandraxray) December 1, 2020
नासाच्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्व्हेटरीच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो शेयर करण्यात आले आहेत. ब्लॅकहोलच्या चारही बाजूने फिरणार्या पदार्थापासून तार्यांपर्यंत, हा चित्रांचा खजिना आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
⭐The white source in this image is a rapidly rotating neutron star, a pulsar, left behind after a core-collapse supernova explosion. The pulsar is generating a wind of high-energy particles that's expanding into its surroundings, illuminating material ejected in the explosion. pic.twitter.com/qmoCRQwPLj
— Chandra Observatory (@chandraxray) December 2, 2020
नेबुलाला चमकावत आहे टी टोरी
नासाने जे सर्वात अगोदर छायाचित्र शेयर केले आहे, त्यामध्ये टी टोरी नावाचा एक तारा आहे, जो व्हॅरियबल नेबुला एनजीसी 1555 ला प्रकाशित करतो. नासाने पुढे सांगितले आहे की, एक व्हॅरियबल नेबुला एक परावर्तीत नेबुला आहे, जो प्रकाशात चमकतो आणि हा प्रकाश एका तार्यामध्ये परिवर्तीत झाल्याने तेजात चढ-उतार होतो. हा पृथ्वीपासून 400 प्रकाश वर्ष दूर आहे.
As matter swirls around the outside of a #BlackHole, it can be redirected in the form of jets of particles & electromagnetic energy. Powerful jets are emanating from the supermassive black hole at the center of galaxy Cygnus A, blasting roughly 250k light years in each direction. pic.twitter.com/oALOKO2qqW
— Chandra Observatory (@chandraxray) December 4, 2020
पुढील छायाचित्र जे नासाने शेयर केले आहे, त्यामध्ये सांगितले आहे की, या छायाचित्रात सफेद स्रोत वेगाने फिरणारा पल्सर, एक न्यूट्रॉन स्टार आहे. पल्सर उच्च ऊर्जा कणांची एक हवा निर्माण करत आहे, जी आपल्या आजूबाजूला पसरवत आहे.
तिसर्या छायाचित्रात ओरियन नेबुलाची माहिती दिली आहे. हे छायाचित्र पाहून डोळे विस्फारतील. हे छायाचित्र इतके आकर्षक आहे की, तुम्ही यासाठी काही बालू शकणार नाही, केवळ ते पहातच रहाल.
चौथे छायाचित्र सुद्धा खुप सुंदर आहे आणि अविश्वसनीय आहे. या छायाचित्रात नासाने सांगितले आहे की, जो पदार्थ ब्लॅकहोलच्या बाहेर फिरतो, त्यास कण आणि विद्यूत चुंबकीय ऊर्जेच्या रूपात रीडायरेक्ट केले जाऊ शकते. छायाचित्रात दिसू शकते की, शक्तिशाली जेट आकाशगंगा सिग्नस ए च्या केंद्रात सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोलमधून निघत आहेत.