नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी मदत पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे अमेरिकी कामगारांना रक्कम भत्ता मिळणार आहे. ट्रम्प आणि ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन मेनूचीन यांनी मंगळवारी अमेरिका वयस्कांना १,००० अमेरिकी डॉलरपर्यंत चेक पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या मदत पॅकेजमध्ये एकूण १ लाख कोटी डॉलर खर्च होणार आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सरळ फायदा होणार आहे. कारण शेकडो अरब डॉलरची गुंतवणूक होणार आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, या मदत पॅकेजबद्दल पूर्ण माहिती अजूनपर्यंत मिळाली नाहीये.
अमेरिका सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने आर्थिक मंदीचा धोका लक्षात घेता व्याज दर जवळपास शून्य केले आहे. राष्ट्राध्यक्षांनी १० पेक्षा जास्त लोकांना एकत्र न करण्याची विनंती केली असून लोकांना घरात राहणे आणि शक्यतो घरातून काम करायला सांगितले आहे. देशभरात शाळा, कार्यालये, बार, रेस्टॉरंट्स आणि अनके दुकाने बंद आहेत.
१९३० च्या दशक मोठ्या आर्थिक मंदीमधून बाहेर पडण्यासाठी ही सर्वात प्रभावी उपायातील एक असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण अशा कोणत्याही कार्यक्रमाला कॉंग्रेसची मंजूरी आवश्यक असेल. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांना यासाठी एकत्र काम करावे लागेल. अमेरिकासारख्या विकसनशील देशात या संसर्ग आजराने मारणाऱ्या लोकांची संख्या वाढून १०५ वर पोहोचला आहे. तर एकीकडे कोरोना व्हयरसचे केंद्र असेलल्या चीनच्या वुहानमध्ये मंगळवारी केवळ एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे.