लोकसभा निवडणूकामध्ये प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन
April 7, 2019
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – १७ व्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण जसे तापले आहे.सूर्याप्रमाणे समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. उमेदवार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यासाठी उमेदवार वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून उदयास आलेले पथनाट्य आज राजकीय पक्षांच्या प्रचाराचे साधन झाल्याचे पाहायला मिळते.
पथनाट्याबाबत लोकांमध्ये उत्साह व आकर्षण आहे. त्यामुळे पथनाट्याचा राजकीय लाभ उमेदवाराला होणे साहजिकच आहे.प्रचार करताना लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच वातावरण निर्मिन करण्यासाठी पथनाट्य प्रभावी साधन ठरत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांतर्फे प्रचारासाठी पथनाट्याचा वापर केला जात आहे. पहिल्यांदा तसा पथनाट्यचा प्रयोग बसपाने १०-१२ वर्षापूर्वी चालविला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रचाराच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हेही अनुकूल ठरत आहेत.
या पथनाट्याच्या एका ग्रुपमध्ये १२ ते १५ कलावंत सहभागी असतात. २९ वर्षापासून काम करणारे नचिकेत म्हैसाळकर यांना शहरातील एका बड्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पथनाट्य बसविण्याची जबाबदारी मिळाली आहे. अॅड. गौरव खोंड यांनी पथनाट्याचे लेखन केले आहे . तर चारुदत्त जिचकार यांनी संगीत दिले आहे. पथनाट्याचे २ ते ३ ग्रुप या कलेतून संबंधित उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पल्लवी जीवनतारे यांच्याकडे प्रचारनाट्य बसविण्याची मागणी करण्यात आली. मात्र उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला. डॉ. बाबासाहेबांचे विचार व संविधान प्रबोधनासाठी पथनाट्य चळवळ चालविणाऱ्या पल्लवी यांना यातून रोजगार मिळत असल्याची बाब मान्य नाही. प्रबोधनासाठी किंवा मतदान जागृतीसाठी निस्वार्थपणे कला सादर करण्यास तयार आहे. पण प्रचारासाठी नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. बौद्ध रंगभूमीचे संजय जीवने यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांसाठी पथनाट्य करतो. उमेदवारांच्या प्रचारासाठी नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.