पुरंदर : बहुजननामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यात भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी व सासवड पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर बिगर परवाना देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असुन, एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. ४ लाख ५१ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि.२७ रोजी सासवड शहराच्या हद्दीत सासवड बाजुकडून हिवरे रोडने एक टोयाटो कंपनीची ईटिओस क्र. एम.एच. १२-एच.एल-७००२ या चारचाकी कार मधुन बेकायदेशीर बिगर परवाना देशी व विदेशी दारू बाळगून जाणार असल्याची गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली होती. त्यानुसार भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.जे.माने, पोलीस शिपाई एम.बी.राऊत, चालक पोलीस पोलीस शिपाई आर.एस.चव्हाण यांनी मिळाला ल्या माहितीच्या ठिकाणी कोडीत नाक्याच्या पुढे एक किलोमिटर अंतरावर दिसणार नाही अशा ठिकाणी सापळा लावुन सासवड बाजुकडून हिवरे रोडने एक टोयाटो कंपनीची ईटिओस क्र. एम.एच. १२-एच.एल-७००२ या चारचाकी गाडीला इशारा करुन थांबण्यास सांगितले. गाडीची तपासणी केली असता गाडीत बेकायदेशीर बिगर परवाना देशी व विदेशी दारू अंदाजे किमंत ५१ हजार २२५ रुपयांचा माल आढळून आला. गाडी चालक प्रितम उत्तमराव गायकवाड रा. गराडे, ता. पुरंदर याने हा माल अमित विठ्ठल घारे रा. गराडे यांच्या घरी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. चार चाकी किंमत ४ लाख व दारुसाठा किंमत ५१ हजार २२५ रुपय असे एकुण ४ लाख ५१ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, प्रितम उत्तमराव गायकवाड रा. गराडे, ता. पुरंदर याने हा माल अमित विठ्ठल घारे रा. गराडे या दोघांना ताब्यात घेतले असुन गुन्हे दाखल केले असल्याची माहिती देण्यात आली.
पोलीस कॉंस्टेबल सोमेश भगवंतराव राऊत यांनी सरकार तर्फे सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढिल तपास भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आर.जे.माने करीत आहेत.