मुंबई : बहुअजनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूका डोळ्यासोमर ठेऊन शिवसेना-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी माकपने पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) पाठिंबा दिला आहे. पालघर मतदारसंघामध्ये ‘बविआ’ च्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सप- बसप व इतर सर्व समविचारी पक्षांना साद घातली जाणार आहे.
पालघरमध्ये माकपच्या पाठिंब्यासाठी अनेक दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी चालू होती.अखेर ते यशस्वी झाले. याबाबत माकपच्या जिल्हा कार्यकारिणीची १९ मार्चला झालेल्या बैठकीत सहमती दर्शवल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला. पालघरमध्ये माकप आणि बविआ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलनाचा निर्णय जाहीर केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सांगितले कि आम्ही आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. असे माकपचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ढवळे यांनी जाहीर केले. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला माकपने पाठिंब्यांची घोषणा केल्याने या पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ही निवडणूक शिट्टी या चिन्हावरच लढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत डहाणू. विक्रमगड व इतर मतदारसंघांत माकप लढणार आहे.