बहुजननामा ऑनलाइन – जर तुम्हाला खत, बी, लोन किंवा कृषी उपकरणांवरील सब्सिडी वेळेवर पाहिजे असेल तर आजच ‘मेरी फसल मेरा ब्योरा’ या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. आज 7 सप्टेंबरला याची शेवटची तारीख आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेती आणि त्यासंबंधित सर्व माहिती वेळेवर मिळेल. ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व या पोर्टलद्वारे मिळतील. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजीव कौशल यांनी सांगितलं, आत्तापर्यंत या पोर्टलवर 6,37,568 शेतकऱ्यांनी 35,16,663.44 एकर जमिनीचं रजिस्ट्रेशन केलं आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन केलं. यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतील. शेतकरी त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास खालील हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकतात, 1800-1800-2117 आणि 1800-1800-2060 या नंबरवर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क करू शकता.
– मेरी फसल मेरा ब्योरा या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट
– रजिस्ट्रेशन साठी वेबसाईट वर जाऊन ‘पंजीकरण’ लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.
– रजिस्ट्रेशनसाठी मागण्यात आलेली माहिती त्या ठिकाणी भरा.
– सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
– रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो नंबर आणि माहिती जपून ठेवा.
रजिस्ट्रेशन नंतर काय लाभ मिळणार
– शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती वेळेवर मिळेल.
– खत, बी, कर्ज यावरील सब्सिडी वेळेवर मिळेल.
– पिकांची लावणी-कापणी यासंबंधीत माहिती मिळेल.
– नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास योग्य ती मदत मिळवून देण्यास पोर्टल मदत करेल.