मुंबई बहुजननामा ऑनलाइन : पैशाच्या हव्यासापोटी 40 हजार मुस्लिमांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे काम मंसूर खान याने करत त्याने थेट दुबई गाठली होती. पैशाच्या हव्यासापोटी लोकांच्या भावनांशी खेळत त्याने चक्क 2 हजार कोटी रुपये गोळा करुन त्याने दुबई गाठली. मात्र त्याला ईडीने शोधून ताब्यात घेतले आहे.
मंसूर खान याने बंगळुरमध्ये आयएमए या नावाने बॅंक सुरु केली होती. त्याच्या मध्यमातून त्याने 2006 मध्ये चिटफंड सुरु केला. यामध्ये त्याने तब्बल 4 हजार मुस्लिम लोकांकडून 2 हजार कोटी रुपये गोळा केले. हा पैसा घेऊन तो फरार होता. या बाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे कर्नाटक पोलीसांनी यावर तपास केला. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आलं. ईडीने त्याला दुबईमध्ये ताब्यात घेतले आहे.
मसूर खानने चीटफंडच्या माध्यमातून मौलानांशी संपर्क करुन त्यांना विश्वासात घेतले. त्यांना समजावून सांगीतले की, ही स्कीम मुस्लिम धर्मीयासाठी चांगली फायदेशीर आहे. सुरवातीला काही काळ त्याने या स्कीमच्या माध्यमातून चांगले काम केले. यामध्ये त्याने अनेक श्रीमंत लोकांना जाळ्यात ओडले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करुन ते लोकांना दाखवण्यात आले त्याच्या माध्यमातून त्याने लोकांना फसवले. तो 2 हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला होता. मात्र तो आता ईडीच्या जाळ्यात आहे.