नवी दिल्ली : पंतप्रधान जनधन योजनेत लोकांना बँक खाते उघडण्याशिवाय अनेक फायनान्शियल लाभसुद्धा मिळतात. जनधन केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्वाकांक्षी फायनान्शियल योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्याचे अनेक लाभ आहेत. जसे की मिनिमम बॅलन्स रक्कम न ठेवल्यास कोणताही चार्ज लागत नाही. प्रत्यक्षात जनधन खात्यांतर्गत उघडण्यात आलेले बँक खाते झीरो बॅलन्स बँक खाते असते. पण याचे इतरही अनेक फायदे आहेत, ज्या अंतर्गत कोणत्याही खातेधारकाला 1.3 लाख रुपयांपर्यंत बेनेफिट मिळतात. जाणून घेवूयात संपूर्ण डिटेल.
अशाप्रकारे होते 1.3 लाख रु चे नुकसान
जनधन खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. या खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रु चा अपघात विमा मिळतो. अधार लिंक नसेल तर हा फायदा मिळत नाही.
30 हजार रु चा दूसरा फायदा
दूसरा फायदा आहे 30000 रु च्या अॅक्सीडेंटल डेथ इन्श्युरन्स कव्हरचा. हे कव्हरसुद्धा खात्याशी आधार लिंक नसेल तर मिळणार नाही. अशाप्रकारे अॅक्सीडेंटल डेथ बेनेफिट होते 1.3 लाख रूपयांचे. खातेधारकाच्या मृत्युनंतर या 1.3 लाख रु च्या रक्कमेसाठी क्लेम करता येतो. पण यासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
ओवरड्राफ्टचा बेनेफिट
या खात्यावर 5000 रुपयांपर्यंत ओवरड्राफ्ट मिळतो. यासाठी सुद्धा आधार कार्ड लिंक असावे लागते. बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक करू शकता.
कसे उघडावे जनधन खाते
यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन, वोटर आयडी कार्डशिवाय मनरेगा जॉब कार्डची मदत घेऊ शकता. या कागदपत्रांद्वारे तुमचा आयडी आणि अॅड्रेस प्रूफची गरज पूर्ण होते. या योजनतेची सुरूवात 15 ऑगस्ट 2014 ला झाली होती.
हे खाते उघडण्यासाठी कोणत्याही बँकेच्या ब्रँचमध्ये किंवा बँक मित्राची मदत घेऊ शकता. दुसरी पद्धत तुम्ही एखाद्या बँकेच्या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करा आणि तो भरून जमा करा. जरूरी डॉक्युमेंट फॉर्मसोबत लावावे लागतील आणि खाते तोबडतोब उघडले जाईल.