बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या इंटर कॉलेजच्या प्रवक्त्याला त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पाच लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षकाच्या पत्नीसह 3 जणांना अटक केली असून, त्यांना तुरुंगात पाठविले आहे, तर अद्यापही बरेच आरोपी फरार आहेत.
आपल्या सौंदर्यावर गर्व करणाऱ्या आरोपी पत्नीने निर्दयपणे आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केला. इज्जतनगर येथील कर्मचारी अवधेश हे इंटर कॉलेजमध्ये प्रवक्ता होते. असे म्हटले जात आहे की, अवधेशची पत्नी विनिता आपल्या पतीपेक्षा(Husband ) 10 वर्षांनी लहान होती, त्यामुळे तिला तिचा नवरा(Husband ) आवडत नव्हता.
विनिताने तिच्या प्रियकरासमवेत आपल्या पतीला संपवण्याचा विचार केला आणि त्यानंतर पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या केली. यानंतर विनिताने आपल्या बहीण, भाऊ, वडील, प्रियकर आणि इतर दोन जणांसह मृतदेहास दफन करण्याचे ठरवले. मध्यरात्री या सर्व लोकांनी मृतदेह गाडीत ठेवला व तो फिरोजाबाद येथे नेऊन दफन केला.
एसएसपी (ACP) रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, इंटर कॉलेजचे प्रवक्ते अवधेश यांच्या पालकांच्या तक्रारीवर इज्जतनगर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर घटनेचा खुलासा होत गेला आणि शेवटी पोलिसांनी खुनी पत्नी विनिताला अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे, तर बरेच आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. लवकरच अन्य आरोपींनाही अटक करण्यात येईल, असे एसएसपी (ACP)ने सांगितले.