बहुजननामा ऑनलाईन – एका पत्नीने बँकेकडून कर्ज घेतले आणि या कर्जाचे पैसे वसुल करण्यासाठी एक व्यक्ती सतत तिच्या घरी येत असत. पती घरी नसल्याने तो तिच्या घरी तासनतास बसत. यानंतर दोघांचे प्रेम झाले आणि एक वर्ष यांचे संबध असेच चालू राहिले. दुसरीकडे, नवरा दिवसरात्र मेहनत करण्यात बाहेर पडत होता. जेव्हा तिच्या पतीला हे कळाले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. चित्रपटाच्या कथेसारख्या या घटनेमध्ये रोमॅन्स, मजबूरी, दगाबाजी, सस्पेंस आणि अॅक्शन हे सर्व आहे. जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती…
बिहारमध्ये किशनगंजमधील खगडा परिसर येथे अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे भडकलेल्या गावातील लोकांनी प्रेमी-प्रेमिका यांना मारहाण केली. गंभीर अवस्थेमध्ये दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बंधन बँकेत काम करणारा प्रवीण कुमार याचे वैवाहित मुलगी हिनाशी प्रेमसंबंध होते. हिनाने बंधन बँकेकडून कर्ज घेतले होते आणि आरोपी प्रवीण कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी हिनाच्या घरी जात असे. यादरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बँक कर्मचारी प्रवीण कुमार आपली विवाहित मैत्रिण हिनाशी मोबाईलवर तासनतास बोलत असे.
दोघेही गेल्या एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम करत होते. हिना दोन मुलांची आई असून तिचा पती मुहम्मद रब्बान ई-रिक्षा चालवतात. हिनाचा नवरा रब्बनला पैसे मिळवण्याची इतकी आवड होती की कधीकधी तो पैसे मिळवण्यासाठी रात्री घरी येत नव्हता.
मंगळवारी तिचा नवरा रब्बन रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसताना हिनाने तिचा प्रियकर प्रवीणला फोन करुन घरी बोलावले. प्रवीण हिनाच्या घरी पोहोचला असता ग्रामस्थांना याची माहिती मिळाली आणि ग्रामस्थांनी हिनाचा नवरा रब्बन याला कळविले. या माहितीवरून रब्बन घरी पोहोचला आणि पत्नीला घराचे गेट उघडण्यास सांगितले. जेव्हा हिनाने गेट उघडले नाही तेव्हा ग्रामस्थांच्या मदतीने गेट तोडण्यात आले.
गेट तोडताच सगळे खोलीत गेले तेव्हा दोन्ही प्रेमी नको त्या स्थितीत खोलीत होते. हे पाहून पती आणि ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पती रब्बन आणि ग्रामस्थांनी दोघांनाही खूप मारहाण केली आणि त्यांना गंभीर जखमी केले. इतकेच नाही तर तिच्या नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढले आणि त्यानंतर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
त्या महिलेने सांगितले की, बंधन कर्जाचे पैसे गोळा करण्यासाठी त्याला हिनाच्या घरी यावे लागत असे. दोघे वर्षभर फोनद्वारे संवाद साधत असत. त्याचवेळी तिच्या पतीने सांगितले की, मी रात्री कामावर गेलो होतो. कोणीतरी सांगितले की, तुमच्या घरात कुत्रा भुंकत आहे, कदाचित एखादा चोर असेल. आम्ही घरी येऊन गेट उघडले तेव्हा आतून एक माणूस होता. आम्ही दररोज काम करतो. ही काय करते, माहित नाही. दार बंद होते, आवाज दिल्यास दरवाजा उघडला नाही कसा तरी दरवाजा उघडला तर तो व्यक्ती दरवाजाच्या मागे लपला होता.