पुणे : बहुजननामा ऑनलाइन – नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनातून साड्यांची आणि ड्रेसची चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वाहन चोरी आणि घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारींसह, दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप, साड्या, ड्रेस असा एकूण 13 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहन बिरु सोनटक्के (वय-21 रा. वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. रोहनने आधी रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या वाहनातून साड्यांची चोरी केली. त्यानंतर पत्निला मित्राचे साड्यांचे दुकान असल्याचे सांगत 30 हून अधिक साड्या गिफ्ट दिल्या. याशिवाय बयकोला खूश करण्यासाठी त्याने ड्रेसचीही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराल गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली आहे. पोलिसांनी हडपसर परिसरात गस्त घालत असताना सराईत गुन्हेगार रोहन अॅमनोरा मॉलच्या मागे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीने चौकशीत नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याने हडपसर, वानवडी, कोंढवा, मार्केट यार्ड, विश्रांतवाडी, पिंपरी आयुक्तालयातील चिखली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरीचे नऊ गन्हे गेल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून दोन मोटारी, एक दुचाकी 18 मोबाईल, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल, 30 साड्या, 12 ड्रेस असा एकूण 13 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.