बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Roshan Saba Azad) हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहण्यात आले होते. त्यामुळे हृतिक आणि सबा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या सगळ्या चर्चांवर आता हृतिकचे (Hrithik Roshan Saba Azad) वडील राकेश रोशन यांनी मौन सोडले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले राकेश रोशन ?
“हृतिक-सबाच्या लग्नाबद्दल मला काही माहिती नाही, मी ऐकलेलं नाही. सध्या त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे. एकमेकांना समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लग्न हा भातुकलीचा खेळ नसून ती एक जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन हृतिक योग्य तो निर्णय घेईल”. असे राकेश रोशन म्हणाले आहेत.
हृतिक रोशन-सबा आझाद लव्हस्टोरी
हृतिक आणि सबाची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. सबा ही रॅपर असून तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हृतिकला तो व्हिडीओ आवडल्याने त्याने सबासोबत मैत्री केली. यानंतर काही दिवसांनी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मागच्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. तसेच त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. एकमेकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Breaking News:- @iHrithik and #SabaAzad are going to get married in November 2023!
— BollywoodKiNews (@BollywoodKiNews) March 2, 2023
सुझान आणि हृतिक 14 वर्षांनी विभक्त
सबा सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी हृतिकचे सुझान खानसोबत लग्न झाले होते. 2000 मध्ये हृतिक आणि सुझानचं लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला 14 वर्षे झाल्यानंतर त्यांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यामुळे या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. विभक्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली आहे. सुजैन सध्या अर्सलान गोनीसोबत रिलेशनमध्ये आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो काही दिवसांपूर्वी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामध्ये दिसला होता.
या सिनेमात त्याच्याबरोबर सैफ अली खान, रोहित सराफ आणि राधिका आपटे महत्वाच्या भूमिकेत होते.
यानंतर आता हृतिकचा ‘फायटर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमात त्याच्याबरोबर दीपिका पादुकोण, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे.
Web Title :- Hrithik Roshan Saba Azad | rakesh roshan on hrithik roshan saba azad wedding date know hrithik roshan saba azad love story
हे देखील वाचा :
Sheezan Khan | अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर; शिझान खानला जामीन मंजूर