बहुजननामा ऑनलाईन टीम : Gold Hallmarking | येत्या 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून बदल करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांमुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे. 1 एप्रिलपासून 6 अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच वैध धरण्यात येणार आहे. त्यामुळे आता हॉलमार्क (Gold Hallmarking) नसलेले सोने अवैध ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 मार्चनंतर सोनं खरेदी करणार असाल हि गोष्ट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू
देशात बनावट दागिन्यांची विक्री करून बनावट दागिन्यांची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी त्यांनी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क गोंधळाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सहा अंकी हॉलमार्क (Gold Hallmarking) शिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉलमार्क म्हणजे काय?
HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. या क्रमांकावरुन सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते.
सोन्याचे दागिने किंवा वस्तूवर हा क्रमांक दिला जातो. या नंबरवरुन सोन्याच्या दागिन्याची माहिती समजते.
याअगोदर दागिन्यांवर 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्क क्रमांक देण्यात येत होते मात्र आता केंद्र सरकारने 4 अंकी
हॉलमार्कवर बंदी घातली असून फक्त 6 अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे असे जाहीर केले आहे.
येत्या 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने विकता येणार आहेत.
संपूर्ण देशात 1338 हॉलमार्किंग केंद्रे आहेत. तसेच आणखी हॉलमार्किंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
Web Title :- Gold Hallmarking | gold hallmarking- rule from april 1 big change gold buying rules now only jewellery with hallmarks will be valid
हे देखील वाचा :
IND vs AUS | फाजिल आत्मविश्वासामुळे भारताचा पराभव; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची टीका