नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दिग्गज नेत्यांपैकी एक असून त्यांच्या समर्थकांचा आकडाही मोठा आहे. पीएम मोदी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सध्या त्यांचे फेसबुक आणि ट्विटरवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, जे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सतत मेसेज पाठवत असतात. या समर्थकांमध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांना आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पाठवायचे आहे आणि भेटायचेही आहे, परंतु या लोकांना हे माहित नाही की, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा. आम्ही तुम्हाला पाच असे प्रमुख मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही पीएम मोदी यांच्याशी संपर्क साधू शकता.
फेसबुक आणि ट्विटरवरून साधा संपर्क
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मद्वारे पीएम मोदींशी संपर्क साधता येऊ शकतो. तुम्ही व्हेरिफाईड अकाउन्टद्वारे तुमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पाठवू शकता.
ई-मेलद्वारे साधू शकता संपर्क
जर तुम्हाला तुमचे म्हणणे पीएम मोदीपर्यंत पाठवयाचे असेल तर तुम्ही त्यांच्या कार्यालयाचा आयडी अथवा त्यांच्या आयडीवर थेट मेल पाठवू शकता.
पत्र पाठवून साधा संपर्क
जर तुम्हाला वरील माध्यमातून संपर्क साधायचा नसेल तर तुम्ही पत्र पाठवून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. वेब इन्फॉर्मेशन मॅनेजर, साऊथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011.
या फोन नंबरद्वारे साधा मोदींशी संपर्क
जर तुम्हाला पीएमशी फोन अथवा फॅक्सवर संपर्क साधायचा असेल तर यासाठी तुम्ही 011-23015603, 11-23018939, 011-23018668 या क्रमांकावर फोन करू शकता. अथवा +91-11-23019545 या 23016857 वर फॅक्स करू शकता.
Visit : bahujannama.com