नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने वेगवेगळ्या सरकारी सेवांपर्यंत पोहचणे सोपे व्हावे यासाठी 2017 मध्ये उमंग अॅप लाँच केले होते. उमंग अॅपद्वारे तुम्ही एकाच ठिकाणी 20689 प्रकारच्या सेवांचा वापर करू शकता. या अॅपच्या मदतीने प्रोव्हिंडंट फंड (पीएफ), डिजिलॉकर, एनपीएस, गॅस सिलेंडरची बुकिंग, पॅन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादीशी संबंधीत सेवा सहजपणे अॅक्सेस केल्या जाऊ शकतात.
कसे डाऊनलोड कराल UMANG APP
अँड्रॉईड फोन यूजर्स प्ले स्टोअर आणि आयफोनचे यूजर्स अॅप स्टोरवरून उमंग अॅप डाऊनलोड करू शकतात. यूजर 9718397183 वर मिस्ड कॉल करून सुद्धा अॅपची लिंक मिळवू शकतात. याशिवाय, https://web.umang.gov.in सुद्धा अॅप डाऊनलोड करण्यासाठी रिडायरेक्ट करते.
Umang App द्वारे चेक करा बॅलन्स
* उमंग अॅप डाऊनलोड करा.
* या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हिस निवडा.
* आता युएएन नंबर टाका.
* यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
* तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.