नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला फोन केला आणि तुमच्याकडे त्याचा नंबर नसला तरीही Truecaller वरून तुम्हाला त्याचे नाव समजू शकते. पण जर तुम्हाला तुमची ओळख उघड करायची नसेल, तर ते आता सोपं आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला सोप्या स्टेप्स् फॉलो करणे गरजेचे आहे.
Truecaller वर आता तुमचे नाव बदलता किंवा लपवताही येणार आहे. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स् फॉलो करणे आवश्यक आहे.
असे बदला तुमचे नाव…
– Truecaller ॲपवर जा. Android मेन्यू पर्यायावर जा आणि टॉप लेफ्ट कॉर्नरवर टच करा.
– Edit your Profile पर्यायावर टॅप करा.
– प्रोफाइलचा पर्याय दिसेल. यामध्ये पहिले नाव आणि आडनाव बदलता येऊ शकते
– Process पूर्ण झाल्यानंतर Save पर्यायावर टच करा
असा करा नंबर डिलिट…
– Android किंवा iOS च्या Truecaller अॅपवर जा
– iOS मधील More आणि अँड्रॉइडमध्ये Menu पर्यायावर जा
– Setting वर टच करा. पुन्हा Privacy Centre वर जा.
– Deactivate पर्यायावर टच करा. या ठिकाणी नंबर डिलीट करायचा की, ठेवायचा हे तुम्ही ठरवू शकता. याला निवडल्यानंतर अकाउंटला Deactivate करा.