नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही सुद्धा एटीएममधून पैसे काढण्यासाठी आज आहात का? मग तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम आवश्य जाणून घ्या…कारण जर तुम्ही बॅलन्स चेक केल्याशिवाय आपल्या खात्यातून पैसे काढलेत आणि बॅलन्स कमी असेल तर यासाठी बँकेला पैसे द्यावे लागतील. अनेकदा ग्राहकांच्या खात्यात कमी पैसे असतात, तरीसुद्धा एटीएममधून ट्रांजक्शन करू लागतात आणि ट्रांजक्शन फेल झाल्यावर स्क्रीनवर अनसफिसिएंट बॅलन्सचा मॅसेज दिसतो. अशावेळी कमी बॅलन्स असल्याने फेल झालेल्या एटीएम ट्रांजक्शनवर बँक चार्ज वसूल करते. सर्व बँकांचे हे वेगवेगळे चार्ज असतात. जाणून घेवूयात फेल एटीएम ट्रांजक्शनवर कोणती बँक किती चार्ज वसूल करते.
फेल ट्रांजक्शनवर द्यावा लागेल इतका चार्ज
State Bank of India
एसबीआय आपल्या ग्राहकांकडून एटीएम ट्रांजक्शन फेल झाल्यास 20 रुपये दंड घेते. जो तुम्हाला जीएसटीसह चुकवावा लागतो.
HDFC Bank
एचडीएफसी बँक ट्रांजक्शन फेल झाल्यास 25 रुपये चार्ज वसूल करते. यासोबत तुम्हाला टॅक्ससुद्धा द्यावा लागतो.
IDBI Bank
सरकारीतून प्रायव्हेट झालेल्या आयडीबीआय बँकेचा ग्राहक दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असेल आणि कमी बॅलन्समुळे ट्रांजक्शन फेल झाले तर प्रत्येक फेल ट्रांजक्शनसाठी 20 रुपये चार्ज द्यावा लागेल.
ICICI Bank
अन्य बँकेच्या एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल (पीओएस) वर कमी बॅलन्समुळे ट्रांजक्शन फेल झाल्यास 25 रुपये प्रति व्यवहार चार्ज द्यावा लागेल.
YES Bank
येस बँक खाताधारकांना बॅलन्स कमी असल्यास 25 रुपये चार्ज द्यावा लागेल.
Axis Bank
अॅक्सीसच्या ग्राहकांना सुद्धा एटीएममध्ये ट्रांजक्शन फेल झाल्यास 25 रुपये चार्ज द्यावा लागतो.
जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जात असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की, तुमच्या खात्यात किती बॅलन्स आहे. अन्यथा बँकेला चार्ज द्यावा लागेल.