बहुजननामा ऑनलाइन – सामान्य लोकांचे पैसे खात्यात सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआय सतत(green light) उपाययोजना करत आहे. नुकतेच, आरबीआयने डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. परंतु, या सर्वानंतर तुम्ही सावध राहाणे सुद्धा आवश्यक आहे. होय,(green light) एक छोटी चूक झाली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती घेवूयात…
का आवश्यक आहे ग्रीन लाइट पहाणे
जेव्हा तुम्ही एटीएममध्ये जाता तेव्हा एटीएम मशीनचे कार्ड स्लॉट लक्षपूर्वक पहा. जर तुम्हाला वाटत असेल की एटम कार्ड स्लॉटमध्ये काही बदल दिसतोय किंवा स्लॉट ढीला आहे, तर वापर करू नका.
कार्ड स्लॉटमध्ये कार्ड लवताच त्यामध्ये लागणार्या लाईटवर लक्ष द्या. जर स्लॉटमध्ये ग्रीन लाइट पेटली तर एटीएम सुरक्षित आहे. परंतु, जर त्यामध्ये लाल लाइट लागत नसेल तर एटीएमचा वापर करू नका. यामध्ये काहीतरी गडबड असू शकते. कारण, एटीएम मशीन पूर्णपणे दुरूस्त असल्यासच ग्रीन लाइट लागते.
रिकामे होऊ शकते खाते
हॅकर कोणत्याही यूजरचा डेटा एटीएम मशीनमधून कार्ड लावण्याच्या स्लॉटमधून चोरू शकतात. ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असा डिव्हाइस लावतात, जो कार्डची पूर्ण माहिती स्कॅन करतो. यानंतर ते ब्लूटूथ किंवा एखाद्या दुसर्या वायरलेस डिव्हाइसने तुमचा डेटा चोरतात आणि बँक खाते रिकामे करतात.
जर तुम्हाला कधी वाटले की, तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकला आहात आणि बँकसुद्धा बंद आहे, तर तुम्ही ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधा. कारण तुम्हाला तेथे हॅकरचे फिंगरप्रिट मिळू शकतात. सोबतच हे सुद्धा पाहता येईल की, तुमच्या जवळपास कुणाचे ब्लूटूथ कनेक्शन काम करत आहे. याद्वारे त्या व्यक्तीपर्यंत पोहचता येऊ शकते.
डेबिट कार्डचे पूर्ण अॅक्सेस घेण्यासाठी हॅकर्सकडे तुमचा पिन नंबर असणे आवश्यक असते. हॅकर्स पिन नंबर एखाद्या कॅमेर्यातून ट्रॅक करतात. यापासून वाचण्यासाठी एटीएममध्ये आपला पिन नंबर एंटर करताना तो दुसर्या हाताने लपवा. जेणेकरून त्याची इमेज सीसीटीव्ही कॅमेर्यात जाऊ शकणार नाही.