मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईच्या मरिन लाईन येथे एका हॉटेल कर्मचाऱ्याला अटक केली असून तो एका महिलेसमोर अश्लील हावभाव करत होता. शनिवारी एल. टी. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी एका चायनीज हॉटेलमध्ये काम करत असून त्याने महिलेसमोर हस्तमैथुन केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
महिला सकाळी पारसी डेअरीच्या आसपास बसलेली असताना आरोपी महिलेच्या जवळ येऊन बसला. दरम्यान महिला तिच्या फोनवर बोलत असताना आरोपी तिच्या जवळ गेला आणि अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. त्यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपी तिथून पळून गेला. त्यानंतर महिलेने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावरून आरोपीची ओळख पटल्यावर त्याला पोलीस ठाण्यात आणल्यावर महिलेने त्याला बरोबर ओळखले.